praise The Lord. Yeshu Janmala | बेथलहेम नगरी येशु जन्माला
Yeshu Janmala
जन्माला…………..
येशु जन्माला ………..
बेथलहेम नगरी येशु जन्माला – 2
Gloria, Gloria
Gloria, In excelsis Deo
बेथलहेम नगरी आपला तारक जन्मला
दाविदाच्या नगरी तो उद्धारक जन्मला
दिली दूतांनी वार्ता, आली हो शांती आता
हर्ष भरे त्याची स्तुती गाऊया
देवाचा पुत्र राजा येशू हो आला
स्वर्गाला सोडूनी तो धरणीवर आला
देण्या मुक्ती तो आला मानवाला
सारे मिळूनी महिमा गाऊया चला
पूर्वीचा तो तारा मार्ग दावितो चला
गोठ्यामध्ये राजा येशू जन्मास आला
तारणारा येशू किती नम्र हो झाला
जाऊया सारे त्याचे दर्शन घेण्याला
पृथ्वीवर स्वर्ग आला, मेळा दूतांचा जमला
गाऊया नवे गीत हो त्याला
देवाचा पुत्र राजा ……..
ओ ,नाचू गाऊ उल्हासाने नाताळ आला
सृष्टी सारी आनंदाने फुलली बघा
मधूर संगीताने हो आळवू त्याला
त्याच्या नावाचा गजर करूया चला
तन मन देऊ त्याला, जगाच्या या राजाला
पमरीयेचा पुत्र बाळ येशू जन्मला